- एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. मार्च २०२१) :- कंपनीचा दोन लाख २० हजाराचा माल टेम्पो चालकाने चक्क भंगारात विकला. हा प्रकार बुधवारी (दि.१८) दुपारी मोशी येथील एशिया स्क्रप दुकानात उघडकीस आला.
याबाबत संतोष बिरनजी पात्रा (२९, रा. तळवडे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीमंत दिलीप गोसावी (२५, रा. खराबवाडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने आरोपीकडे चाकण येथील एका कंपनीत देण्यासाठी लोखंडी प्लेट्स दिल्या. त्याने त्या प्लेट्स थेट भंगाराच्या दुकानात विकल्या.















