- जेष्ठांना सर्वाधिक धोका; मुताऱ्यांची नियमितपणे स्वच्छता व औषध फवारणी गरजेची..
- शिवसेनेच्या दत्तात्रय भालेरावांची पालिकेकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- सार्वजनिक वापरातून कोरोना पसरण्याचा सर्वात जास्त धोका असतानाही अजमेरा, मासुळकर कॉलनी परिसरात मुताऱ्यांची नियमित स्वच्छता होताना दिसून येत नाही. त्यामुळे परिसरातील जेष्ठ नागरिकांना कोरोना संसर्ग होण्याचा मोठा धोका पोहचू शकतो. कोरोना परिस्थितीत संसर्ग टाळण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून अजमेरा, मासुळकर कॉलनीसह पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच सार्वजनिक मुताऱ्यांची स्वच्छता व औषध फवारणी नियमितपणे व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे भोसरी विधानसभा समन्वयक तथा भारत सरकार दूरसंचार सल्लागार समिती सदस्य प्रा. दत्तात्रय भालेराव यांनी पालिकेच्या ‘क’ प्रभाग अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असताना पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पुरेशा सोयीसुविधा असतानाही नियमांचे काटेकोर पालन होताना दिसत नाही. स्वच्छतागृह, मुताऱ्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने परिसरातील जेष्ठ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.
अजमेरा, मासुळकर कॉलनी परिसरात जेष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सकाळी व संध्याकाळी नागरिक बाहेर फिरताना, वॉकिंग करताना सार्वजनिक मुतारीचा वापर करतात. मात्र, या कोरोना परिस्थितीत संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून सर्व सार्वजनिक मुतारीची स्वच्छता व औषध फवारणी नियमितपणे होणे गरजेचे आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने या परिसरातील सार्वजनिक मुताऱ्या, शौचालयांची नियमित स्वच्छता, औषध फवारणी करावी. जेणेकरून कोरोनाचा धोका टळला जाईल, अन्यथा कोरोनाला ब्रेक लागणे मुश्कील होईल, असे या निवेदनात प्रा. भालेराव यांनी म्हटले आहे.













![[ब्रेकिंग न्यूज] लाचखोरीच्या आरोपानंतर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे निलंबित!...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/Screenshot_20261104_200149_Google-190x122.jpg)




