- बीज सोहळा साधेपणाने साजरा करा; पोलिस व प्रशासनास सहकार्य करा – पोलीस आयुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- तीर्थक्षेत्र देहुत ३० मार्चला बीज सोहळा आहे. देहुत गर्दी झाल्यास आरोग्य सेवा व पोलिस प्रशासनावर ताण येईल. कोरोना महामारी वाढेल. यामुळे सर्वांच्या आरोग्याचे दृष्टीने वारकरी संप्रदायाने देहुत यात्रेला गर्दी करू नये. विशेष म्हणजे बंडातात्या कराडकरांनी संयमी भूमिका घ्यावी. शांततेला गालबोट लागेल असे विधान करू नये. नियमावली झुगारून सोहळा साजरा केला तर वारकरी संप्रदाय कोरोणाने बाधित होईल.
देहूनगरीत वारकऱ्यांनी तसेच भाविकांनी गर्दी न करता आपआपल्या भागात मोजक्याच वारकऱ्यांत बीज सोहळा साजरा करून पोलिस व आरोग्य सेवा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केली.
याप्रसंगी पोलिस सहआयुक्त रामनाथ पोकळे, उपआयुक्त मंचक इप्पर, आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, आत्माराम महाराज शास्त्री, पांडुरंग महाराज शितोळे, पंडित महाराज क्षीरसागर, कल्याण महाराज गायकवाड, नरहरी महाराज चौधरी, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील, माजी शिवसेनेचे खेड तालुका प्रमुख उत्तम गोगावले, सचिव अजित वडगावकर मान्यवर उपस्थित होते.


















