- त्यांच्या संपर्कातील पोलिसांनाही कोरोनाची बाधा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२१) :- मोक्काची कारवाई केलेल्या तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तुरुंगात रवानगी करण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय झाली. त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे पिंपरी – चिंचवड शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
कोरोना महामारीला एक वर्ष पूर्ण झाले असतानाच आरोपी व पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने शहरातील पोलिंसाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. पिंपरी – चिंचवड शहरातील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोका) अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार ८ मार्च रोजी काही आरोपीवर मोकाची कारवाई केली. त्यातील तीन आरोपींना १५ मार्च रोजी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
त्यामुळे त्यांची तुरुंगात रवानगी करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात कोरोनाची तपासणी करणे बंधनकारक असल्याने तपासणी केली असता तीन आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
















