- महापौर ढोरे यांची आयुक्तांकडे कडक निर्बंध लादण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२१) :- होळी, रंगपंचमी आणि धुळवडीसाठी नागरिक विशेषत: तरूण वर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो. तसेच, या दिवसात एकमेकांच्या संपर्कात मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे या सणाच्या काळात कडक निर्बंध लागू करावेत, अशी सूचना महापौर माई ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे.
होळी सण रविवारी (दि.२८) आहे. तर, धुलिवंदन सामेवारी दि.२९ आहे. तर, शुक्रवारी (दि.२) रंगपंचमी आहे. रंगाची उधळण करत सण साजरा केला जातो. मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडून एकत्र आल्याने करोना संक्रमण वाढण्याचा धोका आहे.
त्यामुळे या सणाच्या काळात कडक निर्बंध लादल्यास नागरिक घराबाहेर पडणार नाहीत. परिणामी, घरामध्ये साध्या पद्धतीने सण साजरा केला जाईल. त्यामुळे या काळात शहरासाठी कडक निर्बंध लादले जावेत, तसे आदेश प्रशासन व पोलीस यंत्रणेस द्यावेत, अशी सूचना महापौरांनी आयुक्तांना केली आहे.
















