- स्पाईन सिटी मॉल, मोशी प्राधिकरणातील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२१) :- स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. स्पाईन सिटी मॉल, मोशी प्राधिकरण येथे बुधवारी (दि. २४) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
अशोक गोविंद सपकाळ (६०, रा. दिघी), राजपाल श्रीलालसिंग यादव (३९, रा. निगडी) यांच्यासह एका महिलेला अटक करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक सुबराव भीमराव गवारे यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिस्टल स्पा मसाज सेंटरमध्ये आरोपी स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मसाज सेंटरवर छापा मारला. त्यावेळी आरोपी काही तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
















