- मुद्देमालात सोन्या चांदीचे दागिने, दुचाकी, रिक्षा, ट्रक, कार, मोबाईलचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ एकच्या हद्दीतील दरोडा, घरफोडी, जबरी चोरी, चोरी प्रकरणातील दीड कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला.
शुक्रवारी (दि. २६) चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे, राम जाधव, प्रशात अमृतकर उपस्थित होते.
आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकाला परत करणे देखील महत्वाचे आहे. वाटप केलेल्या मुद्देमालामध्ये २१ लाख ९७ हजारांचे सोन्या चांदीचे दागिने, ४३ दुचाकी, तीनचाकी रिक्षा, दोन ट्रक, एक कार, १ लाख ७७ हजारांचे ५ मोबाईल, म्हाळुगे एमआयडीसी येथील दरोडा व घरफोडी झालेल्या ६४ लाख ५६ हजारांच्या सुट्या भागाचा समावेश आहे.
















