- वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२१) :- गुंतवणुकीवर एका वर्षात दुप्पट परतावा देण्याचे फिर्यादी यांना आमिष दाखवले. त्यापोटी आरोपींनी फिर्यादीकडून १३ लाख रुपये घेतले. ठरलेल्या मुदतीनंतर फिर्यादी हे आरोपींकडे पैसे मागण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना गुंतवलेले पैसे आणि आश्वासित मोबदला यापैकी काहीही न देता त्यांची फसवणूक केली.
हा प्रकार ऑगस्ट २०१७ ते २७ मार्च २०२१ या कालावधीत वाकड, बालाजीनगर येथे घडला. याबाबत जोतिबा मारुती रोकडे (वय ३८, रा. गुजरनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सचिन खंडेराव गायकवाड, अश्विनी उर्फ बाई सचिन गायकवाड, खंडेराव यादवराव गायकवाड (सर्व रा. सिंहगड रोड, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















