रिक्षाचालक गंभीर जखमी; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२१) :- रहाटणी फाटा येथून दोन अनोळखी नेपाळी व्यक्ती फिर्यादी यांच्या रिक्षातून प्रवास करत होते. फिर्यादी वडवे हे रिक्षा (एम एच १४ / जी सी ०६६७) चालक आहेत.
रहाटणी फाटा चौकात दोघा आरोपींना दुपारी अडीच वाजता सोडल्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्याकडे भाड्याचे २० रुपये मागितले. मात्र आरोपींनी फिर्यादी यांना १० रुपये दिले. उरलेले पैसे मागितले असता आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून झटापटी केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सिमेंटच्या गट्टूने डोक्यात मारून जखमी केले.
अमित मधुकर वडवे (वय ४२, रा. नखाते वस्ती, रहाटणी) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. याबाबत त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी नेपाळी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















