- पालिका आयुक्तांकडून मंजुरी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ एप्रिल २०२१) :- कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमवर दोनशे बेडचे जम्बो रुग्णालय दोन महिने कालावधीसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ३ कोटी ७७ लाख रुपये खर्च होणार आहे.
महिनाभरापासून आठवड्यात रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. सध्या ऑटो क्लस्टर येथे अतिदक्षता कक्ष सुरू आहे. यासाठी आदेश दिले आहेत. जुलै २०२० मध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून २४ ऑगस्ट २०२० पासून अण्णासाहेब मगर क्रीडा संकुल येथे रुग्णालय सुरू केले होते. पायाभूत या सुविधा उभारण्यासाठी पीएमआरडीएकडून एक्सप्रेशन ऑफ पूर्व इंटरेस्ट प्रसिद्ध केला होता.
जम्बो रुग्णालयासाठी प्रतिदिन प्रतिबेड २ हजार ३९५ रुपये ८३ पैसे असा दर ठरविला होता. त्यानुसार ३४ कोटी ४ लाख रुपये खर्चाच्या कामाचे आदेश दिले होते. रुग्णसंख्या कमी झाल्याने हॉस्पिटल बंद केले होते. रुग्णांची संख्या पुन्हा वाटू लागल्याने महापौर, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तसेच इतर पदाधिकारी, अधिकारी यांची २२ मार्च २०२१ रोजी बैठक आयोजित केली होते. या बैठकीत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलात २०० बेडचे जम्बो कोरोना रुग्णालय दोन महिने कालावधीसाठी सुरु करण्याकरिता आदेश दिले.