- पालिकेकडून आयकॉन हॉस्पिटलला कंत्राट..
- दोन महिने कालावधीसाठी १ कोटींपेक्षा अधिकच खर्च…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेने चिखली घरकुल येथे कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. चिखली घरकुल येथील डी -९ आणि डी -६ या दोन इमारतींमध्ये ऑगस्ट महिन्यात २०० बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. आयकॉन हॉस्पिटल यांना ७ ऑगस्ट २०२० रोजी एका इमारतीतील २०० बेडसाठी प्रतिदिन प्रतिबेड ५४३ रुपये या दराने कामाचे आदेश देण्यात आले होते.
रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुन्हा दोन महिने कालावधीकरिता कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आयकॉन हॉस्पिटल यांना २२ मार्च ते २१ मे २०२१ या दोन महिने कालावधीसाठी कोरोना केअर सेंटर चालविण्यास देण्याबाबत कामकाज आदेश देण्यात आले आहेत.
एका इमारतीसाठी ६६ लाख २४ हजार रुपये खर्च होणार आहे. त्यानुसार, दोन इमारतींसाठी १ कोटी ३२ लाख ४९,२०० रुपये खर्च होणार आहे. कोरोना केअर सेंटर मुदतीपूर्वी बंद केल्यास उर्वरित दिवसांचे बिल ८० टक्क्याऐवजी ६५ टक्के देय राहणार आहे. याबाबतचा करारनामा करण्यात येणार आहे.