- उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण..
- पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२१) :- आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकामध्ये दोन सदस्यीय प्रभाग पद्धत असेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पवार यांनी पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांची पुण्यात बैठक घेतली. आगामी निवडणुकीची व्यहरचना ठरविली पाहिजे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणायची आहे. त्यादृष्टीने कामाला लागा. मागच्या निवडणुकीत पराभूत झालेल्यांना ताकद द्यावी. गल्लीबोळात जावून जनतेची कामे करा. काम लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक द्विसदस्यीय पद्धतीने घेण्याबाबत विचार सुरु आहे. प्रभाग किती वाढतील, यावरही सविस्तर पवार यांनी चर्चा केली.