न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २३) :- पिंपळे सौदागर येथील व्हीएचबीपी. पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये ख्रिसमस नाताळ साजरा झाला. नाताळ किंवा ख्रिसमस हा सण येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो.
यावेळी शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे, शाळेच्या शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सांताक्लॉजच्या वेषात येऊन खाऊ वाटप करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी “जिंगल बेल जिंगल बेल”, “मेरी ख्रिसमस”, या गाण्यांवर नृत्य केले. यावेळी सांताने विद्यार्थ्यांना ख्रिसमस व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.