न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २४ डिसें.) :- प्रभाग क्रमांक २२ काळेवाडी-ज्योतीबानगरमध्ये (दि. २३) रोजी (सी. एम. चषक) मुख्यमंत्री करंडक स्पर्धेंतर्गत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या रांगोळी स्पर्धेचे नियोजन अक्षय गोळवे, स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर, शीतल गोळवे यांनी केले होते.
कार्यक्रमास नगरसेवक सागर आंगोळकर, स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर, मंडल अध्यक्ष प्रमोद ताम्हणकर, देविदास पाटील, ललिता पाटील, छाया पाटील, आश्विनी तापकीर, सौ. पांढरे, सौ. कागदे, सौ. राऊत, सौ. बोंबले, धर्मा पवार, कार्तिक कृष्णन, चंद्रकांत तापकीर, कैलास सानप, भारत टाकुर, नितीन पाटील, सुरेश पाटील, अतुल नढे, संभाजी नढे, हर्षद नढे, गजानन नढे, हनुमंत सुतार, सोमनाथ तापकीर, विशाल वाळके, प्रमोद येवले, भावेश अडवाणी, प्रवीण केमसे, आकाश भारती व भारतीय जनता पार्टीचे सर्व सभासद व मित्र परिवार आदी उपस्थित होते.
चिंचवड विधानसभेचे आमदार व भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शानाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नगरसेवक शंकर जगताप यांच्या उपस्थितीत या भव्य रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेऊन सुंदर-सुंदर रांगोळ्या काढल्या. त्यात गालिचे, ठिपक्यांची रांगोळी, बेटी बचाव, सेव्ह वॉटर, वृक्ष संवर्धन आदी रांगोळ्यांचे प्रकार काढण्यात आले होते. यावेळी सर्व सहभागी स्पर्धकांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.