न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २३) :- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कुलची शनिवार (दि. १५) रोजी औंधमधील ग्रामसंस्कृती उद्यानामध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती.
ग्रामीण जीवनाचे जवळून दर्शन घडावे. आपल्या आजूबाजूला असलेल्या सामुदायिक मदतनीसांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी. हा या सहलीमागचा उद्देश हॊता. पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञान विध्यार्थ्यांना देण्याचा कल चॅलेंजर पब्लिक स्कुलचा राहिलेला आहे.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने ही सहल उत्तमरीत्या पार पडली. यासाठी शाळेचे संस्थापक संदीप काटे यांचे मार्गदर्शन लाभले.










