- पिं. चिं. शहरात आज २२३९ जणांना बाधा; २८ रुग्णांचा मृत्यू तर, २२६१ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१० एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. १०) रोजी २२३९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २२६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १० पुरुष – चिंचवड (५५, ८६ वर्षे), आकुर्डी (४७ वर्षे), चिखली (६४,६८ वर्षे), थेरगाव (७०,६२ वर्षे), पिंपरी (६१ वर्षे), वाकड (४३ वर्षे), दिघी (६४ वर्षे), : ०९ स्त्री चिखली (४३ वर्षे), पिंपरी (६१, ६९ वर्षे), निगडी (६५ वर्षे), चिंचवड (८६,५७,४५,४५ वर्षे), सांगवी (७५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०५ पुरुष- चंदननगर (६३ वर्षे), खडकी (६५ वर्षे), डेक्कन (७२ वर्षे), बाणेर (७७ वर्षे), हंडेवाडी (५७ वर्षे) : ०४ स्त्री – कात्रज (५९ वर्ष), हिंजवडी (६२ वर्षे), पुणे (४७ वर्षे), केंदुर (५५ वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ०८ मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १६५३६७ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १३७९२४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २१५८ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – २४५, ब – ३४७, क – २७५, ड – ३७४, इ – २६१, फ – २६३, ग – २४७, ह – २२७, एकुण – २२३९.