- मोहननगरमधील घटना; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२१) :- जुन्या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. शनिवारी दुपारी सव्वापाच वाजता मोहननगर, चिंचवड येथील सार्वजनिक शौचालयाच्या समोर रस्त्यावर आरोपींनी तरुणाला गाठले. ‘तू आमच्यावर ट्रॅप लावतो काय’ असे म्हणत आरोपींनी तरूणावर कोयता आणि सु-याने वार केले. यात तरुणाच्या डोक्याला, छातीला, हाताला गंभीर दुखापत झाली.
ही घटना शनिवारी (दि. १०) दुपारी मोहननगर, चिंचवड येथे रस्त्यावर घडली. आकाश उर्फ बाळा शिवाजी सलगर (वय २७) असे खुनी हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत दत्तात्रय रंगनाथ वाघमोडे (वय ३८, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी शुभम गणेश राठोड (वय २६, रा. मोई, ता. हवेली), आदित्य गणेश राठोड (वय २४, रा. मोई, ता. हवेली) आणि अन्य दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.