न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज रविवारी (दि. ११) रोजी २४०९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २१०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १५ पुरुष – निगडी (८० वर्षे), बोपखेल (५० वर्षे), वाकड (३६ वर्षे), भोसरी (६३ वर्षे), चिंचवड (६८ वर्षे), पिंपळे निलख (७० वर्षे), थेरगाव (७० वर्षे), चिखली (५१, ६५ वर्षे), च-होली(३८ वर्षे), पिंपळे गुरव (६२ वर्षे), सांगवी (६०, ४२ वर्षे), पिंपरी (८८ वर्षे), भोसरी (६८ वर्षे), ०४ : स्त्री – पिंपळे गुरव (४५, ५० वर्षे), चिखली (३५, ४२ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०७ पुरुष- मुळशी (५० वर्षे), बाणेर (६२ वर्षे), धायरी (६९ वर्षे), खेड (५७ वर्षे), बोपोडी (७६ वर्षे), मुंढवा (६० वर्षे), : ०४ स्त्री – खडकी (५७ वर्ष), आळंदी (२४ वर्षे), बिबेवाडी (५४ वर्षे), शिवाजीनगर (६५ वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १६ मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १६७७७६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १४००२५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २१७७ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – ३६९, ब – ३५८, क – २४४, ड – ३५८, इ – २३७, फ – २४६, ग – २२७, ह – २७०, एकुण – २४०९.