- पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२१) :- दुचाकीस्वाराला मारहाण करून त्याच्याकडील रोकड असलेली बॅग, मोबाईल हिसकावून घेऊन जबरी व चोरीप्रकरणी तीन आरोपींना पकडण्यात आले आहे. ही घटना १४ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली होती.
पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाजवळ हा प्रकार झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. सूरज बाळू ऊर्फ अनिरुद्ध शिंदे (वय १८), करण अनिल सुकाळे (वय १९, दोन्ही रा. थेरगाव) यांना अटक करून एक विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
शैलसिंह मोहनसिंग (वय २९, रा. चिंचवड, मूळगाव पोचोपोलता रेवंदर, जि. सिरोई, राजस्थान) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात १५ मार्च २०२१ रोजी फिर्याद दिली.