- आज एकूण कोरोनाबाधीतांपेक्षा दुप्पटीहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त..
- शहरात आज १५१७ जणांना बाधा; ४५ रुग्णांचा मृत्यू तर, ३३५२ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. १४ ) रोजी १५१७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ३३५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १७ पुरुष भोसरी (७० वर्षे), पिंपळे सौदागर (६८वर्षे), चिंचवड (८१,७६, ७६ वर्षे), प्रेमलोक पार्क (५८ वर्षे), दिघी (६५ वर्षे), पिंपरी(८५, ८३ वर्षे), निगडी (३० वर्षे), वाकड (४६ वर्षे), मोशी (४६,६० वर्षे), विकासनगर (७८ वर्षे), आकुर्डी (५३ वर्षे), वाल्हेकरवाडी (४४ वर्षे), थेरगाव (५२ वर्षे) : ०९ स्त्री – चिंचवड (४५ वर्षे), काळेवाडी (५५ वर्षे), रहाटणी (६८ वर्षे), पिंपळे गुरव (७५,६८,५२ वर्षे), मोशी (५२,५२ वर्षे), बोपखेल (५७ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०९ पुरुष- चाकण (४५वर्षे), हडपसर(६७ वर्षे), औंध (७२,८७ वर्षे), कर्वेनगर (३८ वर्षे), शिरुर (४३ वर्षे), खेड (४१ वर्षे), पुणे (६९ वर्षे), धानोरी (६५ वर्षे) : १० स्त्री – शिरुर (७६ वर्षे), जानवडी (६९ वर्षे), नारायणगाव (४८ वर्षे), हडपसर (५१, ५० वर्षे), कर्वेनगर (९२ वर्षे), खडकी (७२ वर्षे), पुणे (५७, ५२ वर्षे), कोंढवा (६५ वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १२ मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १७३३१९ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १४८६२८ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २२४९ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – १५४, ब – २८१, क – १३५, ड – ३१४, इ – १२९, फ – १४७, ग – १६६, ह – १९१, एकुण – १५१७.