- पालिकेकडून लसीकरण केंद्र जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२१) :- कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस देण्यात येत आहे. १४ ते १८ एप्रिल दरम्यान महापालिकेच्या आठ केंद्रांवर भारत बायोटेकने बनविलेल्या ‘कोव्हॅक्सिन’च्या लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
यात आय हॉस्पिटल मसुळकर कॉलनी आणि वायसीएमएच, जुन्या भोसरी रुग्णालयाजवळील सावित्रीबाई फुले शाळा, तालेरा हॉस्पिटल, चिंचवड, ईएसआयएस हॉस्पिटल, मोहनहर, चिंचवड, यमुनानगर पीसीएमसी रुग्णालय यमुनानगर, पिंपळेगुरव येथील महापालिका रुग्णालयाजवळील पीसीएमसी शाळा, पिंपळेनिलख दवाखाना, आणि पिंपरीतील नवीन जिजामाता हॉस्पिटल येथे आजपासून लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी दुसरा डोस घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.