- अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय इतर सर्व कामकाज बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२१) :- अत्यावश्यक सेवेतील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र व ऑनलाइन परमीट सेवा वगळता इतर सर्वकाम बंद ठेवण्यात येणार आहे. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यातील वाहन परवाने, हस्तांतरण, ना हरकत प्रमाणत्र यासह इतर कामे बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे कार्यालयात मर्यादित कर्मचाऱ्यांना प्रवेश असणार आहे.
राज्यात लागू करण्यात आलेल्या १५ दिवसांच्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर आरटीओतील ९० टक्के कामकाज बंद करण्यात आले आहे. त्यामुळे इतर कामासाठी नागरिकांनी येवू नये, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेत मोडणारी व राज्य शासनाने ठरवून देणाऱ्या वाहनांची योग्यता प्रमाणपत्र व वाहनांचे ऑनलाईन परमीट या दोन सेवा सुरू राहणार आहेत. त्यासाठी एकूण कर्मचारी संख्येपैकी पन्नास टक्केच कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
त्या अनुषंगाने तात्पुरते व पक्का वाहन परवाना, इतर वाहनांची योग्यता तपासणी, वाहन हस्तांतरण, एनओसी यासह इतर कामकाज पूर्णतः बंद असणार आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकांनी कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.