- शहरातील कोरोना ‘लॅब’ना वैद्यकीय विभागाचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२१) :- भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि एनएबीएल मान्यता प्राप्त खासगी प्रयोगशाळांना आरटीपीसीआर तपासणीचे दर ठरवून देण्यात आले आहे.
त्यामुळे प्रयोगशाळांनी ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच दर आकारावेत. जादा दर आकारल्यास साथरोग अधिनियम १९८७ नुसार संबंधित प्रयोगशाळेवर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका वैद्यकीय विभागाने सांगितले आहे.
पिंपरी – चिंचवड शहरातील सर्व खासगी वैद्यकीय विभागाला या संदर्भात पत्र पाठवून सूचना दिल्या आहेत. आरटीपीसीआर तपासणीचे नमुने संकलन केंद्रावर देण्यात आल्यास ५०० रुपये, कोविड केअर सेंटर, रुग्णालये, क्वारंटाइन सेंटर येथे नमुने दिल्यास ६०० रुपये, नागरिकांच्या घरी जाऊन नुमने घेतल्यास ८०० रुपये असे दर आरटीपीसीआर तपासणीसाठी ठरवून देण्यात आले आहेत. रॅपिड अटिजेन तपासणीसाठी आल्यास १५० रुपये, तपासणी केंद्रावर नमुने घेतल्यास २०० रुपये, घरी जाऊन नमुने घेतल्यास ३०० रुपये दर निक्षित करण्यात आले आहेत.