- शहरातील कोरानामुक्त रुग्णांची संख्या ९४ टक्के – शिरीष पोरेड्डी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२१) :- औद्योगिकनगरी पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णाचा पॉझिटिव्हिटी दर १९.२२ तर, मृत्यूदर १.७१ टक्के आहे. खासगी आणि शासकीय अशी ७६१३ बेडची व्यवस्था महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.
महापालिकेचे कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी यांची प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. शिरीष पोरड्डी म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय विभाग सक्षमतेने काम करीत आहे. कोरानामुक्त रुग्णांची संख्या ९४ टक्के, तर पॉझिटिव्हिटी दर १९.२२ टक्के दर आहे. तर मृत्यूचा दर १.५२ टक्के आहे.
होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी गाईडलाईन करण्यासाठी दोन पाळ्यांमध्ये डॉक्टरांचे पथक काम करीत आहे. तसेच ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, रुग्णसंख्या वाढल्याने अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलातील जम्बो रुग्णालय ४०० बेड सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात १०० बेड ऑक्सिजनयुक्त, ५० बेड आयसीयू आणि ५० बेड एचडीयू असे २०० बेडचे जम्बो रुग्णालय दोन महिने कालावधीसाठी सुरू करण्याकरिता आदेश दिले आहेत.
शहरातील बेडची सद्य:स्थिती
बेड प्रकार पालिका रुग्णालय खासगी रूग्णालय
ऑक्सिजनविरहित १६४ १५५५
ऑक्सिजनसहित १०२४ १५२०
आयसीयू विदाऊट व्हेंटिलेटर १६९ ५२६
आयसीयू व्हेटिलेटर १४४ १९३
अॅक्टिव्ह सीसीसी २३१८ ०
महापालिका रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येत आहे. येत्या दोन दिवसात तीन हजार इंजेक्शन महापालिकेला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यातील काही इंजेक्शन खासगी रुग्णालयांतील रुग्णांना देता येतील का? याबाबत आयुक्त राजेश पाटील विचार करीत आहेत.