- सध्या एकही हेंटिलेटरची खाट पालिका रुग्णालयात उपलब्ध नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२१) :- कोरोनाच्या गंभीर, अतिगंभीर रुग्णांना आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटरच्या खाटांमध्ये वाढ केली जाणार आहे. पुढील दहा दिवसांत जम्बो हॉस्पिटल, ऑटो क्लस्टर आणि महापालिकेच्या रुग्णालयात हेंटिलेटरच्या ३८० खाटा उपलब्ध होणार आहेत.
शहरात महापालिका रुग्णालयात एकही व्हेंटिलेटरची खाट उपलब्ध नाही. खासगी रुग्णालयात चार खाटा उपलब्ध आहेत, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. महापालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये ७४ खाटा असून त्यात वाढ करून २९० खाटांची उपलब्धता केली जाणार आहे.
शहरातील कंपन्या सीएसआर अंतर्गत ९० खाटा देणार आहेत. पुढील दहा दिवसांत जम्बो हॉस्पिटल, ऑटो क्लस्टर आणि महापालिकेच्या रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या ३८० खाटा उपलब्ध होणार आहेत. तसेच होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असलेल्या २० हजार रुग्णांची विचारपूस करण्यासाठी आजपासून कॉल सेंटर सेवा सुरू झाली आहे. याबाबतची माहिती प्रवक्ते शिरीष पोरेडी, जनतासंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी दिली.


















