- नातेवाईकांची गैरसोय थांबली..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२१) :- निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीमधील विद्युतदाहिनी दोन दिवसांपासून बंद असल्याने अंत्यसंस्कारासाठी वेळ लागत होता. मात्र, शुक्रवारी (दि.१६) विद्युतदाहिनी दुरुस्त करण्यात आल्याने अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांची होत असलेली गैरसोय थांबली आहे.
शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दिवसाला पन्नास ते साठ रुग्णांचा मृत्यू होत आहे. निगडी स्मशानभूमीमध्ये दोन विद्युतदाहिनी असल्याने शहराबाहेरील व्यक्तिंच्या मृतदेहांचा अतिरिक्त ताणही या दाहिनीवर पडत होता.
निगडी येथील विद्युतदाहिनीतील बिघाड दुरुस्त करताना विद्युत दाहिनीबंद पडली. मात्र, शुक्रवारपासून विद्युतदाहिनीतील बिघाड दुरुस्त करून ती पूर्ववत सुरू झाली आहे.


















