- लक्षणे दिसताच तपासणी करून घ्या..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२१) :- शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने एप्रिलमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. परंतु, नागरिकांनी न घाबरता वेळीच उपचार घेतले तर कोरोनाला हरविणे शक्य आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
शहरात १५ एप्रिलपर्यंत शहराच्या हद्दीतील २८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर शहराच्या बाहेरील; परंतु शहरात उपचार घेणाऱ्या ११८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत शहराचा पॉझिटिव्हिटी रेट १९.२२ टक्के आहे. तर, मृत्यूदर १५१ टक्के आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. परंतु, मृत्यू वाढत असल्याचे दिसून येत आहे.
मृत्यू होणाऱ्या रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. ज्येष्ठ नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती कमी असते. वयानुसार काही व्याधी असतात. त्यामुळे अशा रुग्णांवर उपचार करताना इतर व्याधी नियंत्रणात राहणे गरजेचे असते. ते नियंत्रणात न राहिल्यानेही मृत्यू होतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी. कोणताही त्रास होत असल्यास त्वरित उपचार घ्यावा. कोरोनाची लक्षणे दिसल्यास जिथे कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशा ठिकाणी उपचार घ्यावेत.


















