- तरुणाच्या छातीत चाकू खुपसून खुनाचा प्रयत्न..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- पैशांच्या कारणावरून वाद होऊन हाणामारी झाली. छातीत चाकू खुपसून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न झाला. काळभोर चाळ, दुर्गानगर येथे शनिवारी (दि. १७) ही घटना घडली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात गणेश साळुखे (वय २७, रा. दुर्गानगर), यांनी फिर्याद दिली आहे. राकेश बजरंग साळुखे, ओमकार बजरंग साळुखे, सोनी (वय २२), मोनिका, कविता (वय ४२) काळभोरचाळ, दुर्गानगर यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादीचे मोठे भाऊ राहुल यांनी चुलते बजरंग साळुखे यांना ऊसने पैसे दिले होते. ते पैसे फिर्यादीने मागितले.
त्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाला लोखंडी कोयता, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात ते जखमी झाले.
दुस-या प्रकरणात कविता बजरंग साळुखे (वय ३७, रा. काळभोर चाळ, दुर्गानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश राजेंद्र साळुखे (वय २५), राहुल राजेंद्र साळुखे (वय ३२), सारिका राहुल साळुखे (वय २८) आणि इतर तीन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी कविता यांचा पुतण्या आरोपी गणेश याने पैशाच्या कारणावरून फिर्यादीचा मुलगा ओमकार याला लाकडी बांबूने डोक्यात मारून जखमी केले. फिर्यादीचा दुसरा पुतण्या आरोपी राहुलने फिर्यादीचा मुलगा राकेशला जीवे मारण्याच्या उद्देशाने छातीत चाकू खुपसून गंभीर जखमी केले. इतर आरोपीनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलीलाही मारहाण केली.