- महापौर ढोरेंची पालिका आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातंर्गत सध्या दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना विषाणू संसर्गाचा कहर वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रात विविध विभागांमार्फत वेगवगळ्या स्तरांवर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
तथापि कोरोनामुळे किंवा इतरही अनेक कारणांमुळे शहरातील अनाथ, बेघर व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही नातेवाईक नसल्याने मृतदेहाची विटंबना होऊ नये.
तसेच कोरोना संसर्गाचा धोका होऊ नये यासाठी अशा बेवारस व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार महापालिकेच्या वतीने करणेचा धोरणात्मक निर्णय घेणेबाबत संबंधितास योग्य ते निर्देश द्यावेत, अशी सूचना महापौर ढोरे यांनी पालिका आयुक्ताकडे केली आहे.


















