महापालिकेच्या कोविड अंतर्गत कामकाजाचे चोख नियोजन करा – राजेश पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२१) :- महापालिकेच्या कोविड अंतर्गत कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या मान्यतेशिवाय महापालिका कार्यक्षेत्र सोडू नये, असा आदेश आयुक्त राजेश पाटील यांना काढला आहे.
कोविड नियंत्रण, त्यासंदर्भातील कक्षाचे सार्वजनिक, साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कामकाज सुरु राहील. नोडल, समन्वय, नियंत्रण अधिकारी यांची उपस्थिती त्यासाठी अनिवार्य राहील. विभागप्रमुखांनी त्याच्या नियंत्रणाखाली कार्यरत अधिकारी कर्मचारी आवश्यकता भासेल, त्यावेळी संपर्क साधल्यानंतर उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी.
कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन, वैद्यकीय, आरोग्य विभाग आणि इतर विभागप्रमुखांमार्फत ज्या अधिकारी, कर्मचा-यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत, अशा कार्यालयांनी उपलब्ध अधिकारी, कर्मचारी यांचे काटेकोरपणे नियोजन करावे. प्रशासनाशी समन्वय साधून मनुष्यबळ उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
















