न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२१) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून चिखली – पेठ क्रमांक १२ येथे पंतप्रधान आवास योजनेत उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पासाठी ३० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी ऑनलाईन अर्जाची नोंदणी केली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली.
सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज समाप्ती सोमवारी (दि. १९) झाली. ऑनलाइन पेमेंट स्वीकृती अंतिम तारीख मंगळवारी (दि. २०) होती. यापूर्वी ऑनलाइन अर्जासाठी ३० मार्चपर्यंत मुदत होती. नागरिक व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेऊन १८ एप्रिलपर्यंत मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती.
पेठ क्रमांक १२ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी ३३१७ तर अल्प उत्पन्न गटासाठी १ हजार ५६६ सदनिका साकारत आहे. गवळी म्हणाले, पेठ क्रमांक १२ मधील गृहप्रकल्पासाठी ३० हजारापेक्षा अधिक नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मंगळवारी ऑनलाईन पेमेंट स्वीकृती झाल्यानंतर एकूण अर्जदारांची संख्या निश्चित होईल.