- गजा मारणे मिरवणुक प्रकरण अंगलट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२१) :- तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत गुंड गजा मारणे याने मिरवणुक काढली होती. या मिरवणुकीला भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी मदत केल्याची माहिती समोर आल्याने, त्यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
या मिरवणुकीत जवळपास तीनशेहून अधिक चार चाकी वाहने सहभागी झाली होती. या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, राज्यभरात एकच चर्चा सुरू झाली.