- पालिकेकडून समन्वयासाठी उपआयुक्त व इतर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने स्मशानभूमी समन्वयक हेल्पलाईन सुरू केली आहे. कोरोना रुग्णांच्या अंतिम संस्काराची प्रतिक्षा कमीत कमी व्हावी, या उद्देशाने महापालिकेने याची स्थापना केली आहे. सदरची सुविधा तीन शिफ्ट मध्ये २४ तास सुरु राहणार आहे. महापालिका उपआयुक्त मंगेश चितळे यांनी पुर्ण कामकाजाचे नियोजन व समन्वय केलेले आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
सद्यस्थितीमध्ये शहरामध्ये कोविड -१९ प्रादुर्भावामुळे मृतांची संख्या वाढत आहे. शहरामध्ये सांगवी, भोसरी, पिंपरी, भाटनगर, निगडी, नेहरुनगर आदी ठिकाणी शवदाहिनी आहेत. कोरोनामुळे मृत होणाऱ्या स्मशानभूमीच रुग्णांवर याठिकाणी अंतिम संस्कार जाणार केला जातो. त्याठिकाणी होणारी रुग्णांच्या अंतिम संस्काराची प्रतिक्षा पाहता शहरात अशा कोविड रूणांना लाकडांद्वारे दहन करण्याचाही निर्णय महापालिकेने यापुर्वीच घेतलेला आहे. परंतु, तरी सुध्दा बऱ्याच ठिकाणी अंतिम संस्काराची प्रतिक्षा होत आहे.
यासाठी मनपाने स्मशानभूमी समन्वयक हेल्पलाईन सुरू केली आहे. महापालिकेकडून माहितीसाठी ०२०-६७३३११५५ हा क्रमांक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ज्या कोविड रूणांचा मृत्यू झालेला आहे त्याचा दाखला महापालिके मार्फत देण्यात येतो. त्यावळी सबंधित कर्मचारी महापालिकच्या हेल्पालाइनवरती फोन करून कोणत्या ठिकाणी अंतिम संस्काराची प्रतिक्षा कमी आहे याची विचारणा करू शकतात. त्या स्मशानभूमीची त्याना जागा सांगितली जाणार आहे.
या कामकाजासाठी नियुक्त्या करण्यात आलेल्या असून याबाबत उपआयुक्त मंगेश चितळे यांनी पुर्ण कामकाजाचे नियोजन व समन्वय केलेले आहे.
विटकर सुनिल बबन-लिपिक, हेडाऊ ललित ज्ञानेश्वर-स्था. अभियांत्रिकी सहाय्यक, पायगुडे रोहित प्रकाश-स्था. अभियांत्रिकी सहाय्यक, गायकवाड राहुल भगवान-स्था. अभियांत्रिकी सहाय्यक.