न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२१) :- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. संचारबंदी आणि कडक लॉकडाउनच्या काळात नागरिकांना लस घेण्यासाठी घराबाहेर पडावे लागते. मात्र, खासगी वाहन व इतर सोय उपलब्ध नसल्याने अनेक जण लसीकरण केंद्रापर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यामुळे लसीकरणासाठी मोफत रिक्षाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यासाठी रिक्षाच्या मागे संपर्क क्रमांक व माहितीपत्रक लावण्यात आले आहे. ही सोय केवळ लसीकरणासाठी असणार आहे. त्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते युनूस पठाण यांनी केले आहे. लसीकरण ठिकाणापर्यंत रिक्षा प्रवास व लसीकरण झाल्यावर पुन्हा घरापर्यंत सोडले जाणार आहे. यासाठी पाच रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.