- रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या “अर्सेनिक अल्बम” गोळ्यांचे ग्रामस्थांना मोफत वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२१) :- सध्या राज्यभरात कोरोनाने थैमान माजविले आहे. बीड जिल्ह्यातही कोरोनाची आकडेवारी वाढत आहे. रुग्णसंख्या आटोक्यात रहावी यासाठी पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे वाहतूक आघाडी अध्यक्ष तथा माजी शहर भाजप उपाध्यक्ष उद्योजक दीपक मोढवे पाटील व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने आष्टी तालुक्यातील खुंटेफळ (वाटेफळ) गावात ‘एक हात मदतीचा’ माध्यमातून गावातील ग्रामस्थांना “अर्सेनिक अल्बम” या आयुर्वेदिक रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी गांवचे माजी सरपंच उद्धवराव मोढवे पाटील, विद्यमान सरपंच ज्योतीताई रवींद्र मोढवे पाटील, माजी सरपंच विजया उद्धवराव मोढवे पाटील, रवींद्र मोढवे पाटील, माजी सरपंच सुरेशराव मोढवे पाटील, उपसरपंच रमेश अमृते, माजी उपसरपंच राजू वाघमोडे, माजी सरपंच विठ्ठलराव गुंड, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते सुरेश वाळके, गोपीनाथ वाळके, रामभाऊ वाळके, भैरवनाथ सासवडे, साहेबराव बर्डे, सोन्याबापू बर्डे, अमोल गुंड, दिगंबर वाळके, योगेश मगर, आसाराम गुंड, बबलू कुलकर्णी, रोहिदास लोखंडे, पोपट लोखंडे, बबन सासवडे, रावसाहेब कोहक, राजू पारधे, सुभाष कोळी, डीगू दोर्गे, बाप्पू कुलकर्णी, शिवाजी लोखंडे, लालासाहेब लोखंडे, मुरली कोहक, ज्ञानदेव चौधरी, रावसाहेब गुंड, दादा बेरड, ज्ञानदेव अमृते, दिलीपराव मोढवे, बबनराव चौधरी, अनिल गाडे, बाप्पूराव मोढवे, मारुती चौधरी, शरद गुंड, विकास गुंड, दत्ता गाडे, बाळासाहेब गाडे, बाबासाहेब गुंड, दत्तू गाडे, बाळासाहेब घिगे, अजिनाथ गुंड, दत्तू गुंड, संजय गुंड, विजू गुंड, ज्ञानेश्वर गुंड, शिवाबाबा गुंड, सतीश गुंड, तुळशीराम गुंड, महादेव वाळके, भाऊसाहेब कोहक, बाबा कोहक, कुशीनाथ कोहक, बिभीषण सासवडे, नारायण मगर, बंडू वाळके, लाला भॊसले, संतोष भोसले, माजी सरपंच संभाजीराव लोखंडे, बाप्पू सोनवणे, अभिजित देशमुख, शुभम मोटे, सुदाम साळवे, संतोष लोखंडे, मुरली कोहक, बन्सीमामा चौधरी, बाबू चौधरी, महेंद्र चौधरी, दशरथ लोखंडे आदी उपस्थित होते.
दीपक मोढवे पाटील म्हणाले, बीड जिल्हा व आष्टी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनावर केवळ रोग प्रतिकार शक्तीच उपचार आहे. त्यातच कोरोनामुळे हातावरील पोटं असलेले गोरगरीब ग्रामस्थ मेटाकुटीला आलेले आहेत. त्यामुळे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल राज्यमंत्री सुरेश अण्णा धस यांच्या सूचनेनुसार मोढवे पाटील कुटुंबायांनी मदतीचा एक छोटासा प्रयत्न म्हणून, सोशल डिस्टंसिंग व मास्क परिधान करून, गावातील प्रत्येक घरात “अर्सेनिक अल्बम” या आयुर्वेदिक रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे मोफत वाटप केले. यापूर्वी देखील मोढवे पाटील कुटुंबीयांनी गावातील ग्रामस्थांना गव्हाचे, पाच किलो साखरेचे मोफत वाटप केले होते. त्यामुळे मोढवे पाटील यांच्या मदतीमुळे ग्रामस्थ सुखावले आहेत.