- पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाची मोक्का कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२१) :- मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखासह एका सदस्याला बेड्या ठोकण्यात आल्या. दोन्ही आरोपी मोस्ट वाँटेड होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने ही कामगिरी केली.
गुन्हेगारी टोळीचा प्रमुख सुरेश उर्फ बॉबी विलास यादव (वय ३०, रा. पांढरकरचाळ, आकुर्डी, मूळगाव कशेडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) आणि टोळीचा सदस्य कल्पेश संदीप पवार (वय २४, रा. पंचतारानगर, आकुर्डी, मूळगाव कसबा, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.