न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसें.) :- कंपनीने दिलेल्या को-या चेकचा गैरवापर करून त्याद्वारे कंपनीच्या खात्यातून लाखो रुपये काढून घेतले. याबाबत रामदास मानसिंग माने (वय ५९, रा. रामायण बंगला, संभाजी नगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमोल विठ्ठल दरेकर (रा. संतनगर, मोशी) आणि अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल फिर्यादी यांच्या कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करतो. मागील दीड वर्षांपासून त्याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून कंपनीच्या कामासाठी दिलेल्या को-या चेकचा गैरवापर करून कंपनीच्या खात्यातून काही रक्कम काढली. तसेच स्वतःच्या वेतनामध्ये जास्तीची रक्कम काढली आणि कंपनीच्या मालाची देखील परस्पर विक्री केली. आरोपींनी एकूण ३ लाख १५ हजार ९०४ रुपयांचा अपहार केला. एमआयडीसी भोसरी पुढील पोलीस तपास करीत आहेत.










