न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसें.) :- माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस प्रमोद निसळ, भाजपच्या प्रभारी उमा खापरे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक विलास मडिगेरी, शितल शिंदे, नामदेव ढाके, अनुराधा गोरखे, मोरेश्वर शेडगे, माऊली थोरात, राजू दुर्गे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अमित गोरखे उपस्थित होते.










