- बेजबाबदार व दोषींवर आयुक्त कारवाई करणार?...
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जम्बो कोविड हाॅस्पिटलमध्ये ५८ रुग्ण संख्याच्या एका ऑक्सिजन वाॅर्डमध्ये एकही रुग्ण नसताना ऑक्सिजन वापर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शहरात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, ऑक्सिजनची गरज भागवताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळेच जिल्हा प्रशासनाने उपलब्ध होणाऱ्या ऑक्सिजनचा काटेकोर वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरासह जिल्ह्यातही ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला असताना अशा प्रकारे बेफिकीरपणे वागणा-या दोषींवर पालिका आयुक्त काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.


















