- मागणी व पुरवठ्याच्या वाढीमुळे ऑक्सिजनचा मर्यादित साठा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२१) :- शहरातील खासगी रुग्णालयांत पुन्हा ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. एक दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक आहे. खासगी रुग्णालयात सुमारे दीड हजार रुग्ण उपचार घेत आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियोजनअभावामुळे टंचाई निर्माण झाली.
काही खासगी हॉस्पिटलने ऑक्सिजन रुग्णांचे अन्यत्र स्थलांतर सुरू केले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील १३५ खासगी रुग्णालयांत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ९ हजार खाटा रुग्णांसाठी आहेत. सद्य:स्थितीत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये श्वसनाच्या वाढत्या तक्रारींमुळे अधिकाधिक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा मर्यादित असल्यामुळे आणि मागणीत वाढ झाल्याने ऑक्सिजनची कमतरता भासत आहे.
महापालिका हॉस्पिटलमध्ये दिवसाला लिक्विड ऑक्सिजन साधारणत: ५० मेट्रिक टन आणि ३० मेट्रिक टन खासगी हॉस्पिटलला लागतो. अडीच हजार जम्बो आणि १५ ते २० डिवरा सिलिंडर संपूर्ण शहरासाठी लागतात. मात्र, ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा यात अंतर पडत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे.


















