न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२१) :- घरातून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह थेरगाव येथील केजुदेवी बंधाऱ्याजवळ मिळून आला. ही घटना सोमवारी (दि. २६) सकाळी उघडकीस आली. क्रांती संदीप फरताळे (३२, रा. ताथवडे) असे मृत महिलेचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथील केजूदेवी बंधाऱ्याजवळ नदीपात्रात एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.
दरम्यान, क्रांती फरताळे यांचे पती संदीप नारायण फरताळे (वय ४७) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यावरून त्यांची ओळख पटवण्यात आली. तपास वाकड पोलिस करीत आहेत.
















