- अन्यथा पाचशेचा दंड; पोलीस आयुक्तांचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड पोलीस आणि महापालिका एक योजना आखत आहे. या योजनेनुसार मंडई किंवा मॉलमध्ये प्रवेश करताना केवळ ५० जणांनाच टोकण दिले जाणार आहे.
त्या ५० जणांनी अर्धा तासात आपली खरेदी उरकून घ्यायची आहे. जर खरेदीसाठी अर्धा तासापेक्षा अधिक वेळ लागल्यास संबंधित नागरिकाकडून ५०० रुपये दंड वसूल केला जाणार आहे.
याशिवाय रुग्णवाहिका, शववाहिनी यांचे दर आरटीओने निश्चित केले आहे. तसेच महापालिका हद्दीतील करोनामुळे मृत झालेल्यांवर मोफत अंत्यसंस्कार केले जात आहेत. रुग्णवाहिकेने जादा दर आकारणी केल्यास तसेच अंत्यविधीस पैसे घेतल्यास संबंधितांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला.


















