- पालिकेकडून कोणतीही मदत नाही; सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२१) :- प्लाझ्मा दात्याला महापालिकेच्या वतीने दोन हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार असल्याची घोषणा महापालिका पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, प्लाझ्मादात्यांना अशी कोणतीही रक्कम मिळत नसल्याचा आरोप समाजसेवक संजय गायखे यांनी केला आहे.
प्लाझ्मा दात्यांना दोन हजार रुपये मिळत तर नाहीतच, मात्र प्लाझ्मा घेण्यासाठी सहा हजार रुपये मोजावे लागत असल्याचा अनुभव रुग्णाच्या नातेवाइकांना येत आहे.
अनेक पदाधिकाऱ्यांनी आता प्लाझ्मा मोफत मिळणार असल्याची घोषणा केल्याने रुग्णाच्या नातेवाइकांना दिलासा मिळाला होता. मात्र आता ही फसवणूक असल्याची बाब लक्षात येत आहे. त्यामुळे ही आश्वासने न पाळल्यास आंदोलनाचा इशाराही गायखे यांनी दिला आहे.
















