- पोलीस शिपायावर आयुक्तांकडून निलंबनाची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२१) :- दापोडी येथील हॅरिस ब्रिज नाकाबंदी दरम्यान घटलेल्या घटनेत बेजबाबदारपणे बंदोबस्ताच्या नियोजनात हलगर्जीपणा केला. तसेच शासकीय कामात व्यत्यय आणण्याचे काम केले असल्याचा ठपका ठेवत पोलीस शिपाई पोवार याना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी निलंबनाची कारवाई केली.
पॉइंटवर गुरुवारी (दि. २२) रात्री फिर्यादी हवालदार किसन विठोबा गराडे (वय ५२) आणि आरोपी पोलीस शिपाई पोवार यांची ड्युटी होती. त्यावेळी रात्री साडेदहाच्या सुमारास नाकाबंदीच्या ठिकाणी हजर राहण्यासाठी फिर्यादी गराडे यांनी आरोपी सूरज जालिंदर पोवार याना फोन करून सांगितले.
उद्धटपणे बोलून पोलीस शिपाई पोवार याने गराडे यांना लोखंडी गजाने तसेच लाथांनी मारहाण केली. याप्रकरणी गराडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस शिपाई पोवार हे भोसरी वाहतूक विभागात कार्यरत आहेत.
















