न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२१) :- रावण टोळीचा सदस्य आणि मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला सापळा रचून अटक करण्यात आली. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडविरोधी पथकाने वारजे परिसरात ही कारवाई केली.
रुपेश प्रकाश आखाडे (२४ रा. शिवणे, वारजे, पुणे. मूळ रा. त्रिवेणीनगर, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आखाडे हा सराईत असून त्याच्यावर, दरोडा, मारहाणीचे तीन गुन्हे दाखल आहेत.
त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. तेव्हापासून तो फरार होता. दरम्यान, गुंडा विरोधी पथकाने तांत्रिक विश्लेषण करून त्याला अटक केली.