- पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयात १६ अधिकाऱ्यांच्या बदल्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण १६ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये सात महिला अधिकारी आहेत. अपर पोलिस महासंचालक (आस्थापना) कुलवंत कुमार सारंगल यांनी बुधवारी (दि. २८) याबाबतचे आदेश दिले आहेत.
राज्य पोलिस दलातील उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयात १६ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. तर, पिंपरी- चिंचवड आस्थापनेवरील दहा उपनिरीक्षकांची पदोन्नतीवर अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस अधिकारी (बदलून आलेले ठिकाण) :-
मनीषा महादेव बनसोडे / मनीषा शिवाजी हाबळे (पिंपरी – चिंचवड), स्वप्नाली दत्तात्रय पलांडे (मीरा भाईंदर), वर्षा नारायण जगदाळे (सांगली), पूनम दादासाहेब जाधव (पुणे ग्रामीण), सीमा सुरेश मुंडे (पुणे ग्रामीण), राजश्री छगन खैरनार / राजश्री गणेश पावरा (मुंबई शहर), प्रमिला पांडुरंग क्षीरसागर (पुणे शहर), लुईस अँथोनी मकासरे (पुणे शहर), रमेश पंडित यादवडे (पोलिस प्रशिक्षण केंद्र नानविज दौंड), प्रसाद सुरेश दळवी (पिंपरी – चिचवड), तौफिक युसूफ सय्यद (मीरा – भाईंदर), नारायण आनंदराव पाटील (मुंबई शहर), कल्याण नारायण घाडगे (मुंबई शहर), संदीप आप्पासाहेब देशमुख (पुणे शहर), मनोजकुमार रामबली पांडे (हिंगोली), सिद्धनाथ भगवान बाबर (पुणे शहर / अमरावती परिक्षेत्र).
पिंपरी चिंचवड शहरातून बदलून गेलेले अधिकारी (बदली झालेले ठिकाण) :-
हानमंत हरीचंद्र मिटके (नांदेड परिक्षेत्र), उत्कर्षा प्रमोद देशमुख (कोकण परिक्षेत्र), प्रशांत हनुमंत साबळे (नागपूर शहर), शरद निवृत्ती आहेर (अमरावती परिक्षेत्र), महेंद्र दिलीप पाटील (नागपूर शहर), अरविंदकुमार भीमराव हिगोले (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), महेंद्र कारभारी आहेर (नागपूर शहर) विजय बाबासाहेब बढे (ठाणे शहर), प्रमोद रामकृष्ण कटोरे (नाशिक परिक्षेत्र), साजय धोंडीराम निलपत्रेवार (नांदेड परिक्षेत्र).