न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. २५ डिसें.) :- निगडी येथील दि इंस्टिट्यूट ऑफ़ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या सीए विद्यार्थी परिषदेस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
यावेळी पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष सीए आमोद भाटे, उपाध्यक्ष आणि सीए विद्यार्थी संघटना अध्यक्ष सीए युवराज तावरे, सचिव व खजिनदार सीए प्राजक्ता चिंचोळकर, तत्कलिक अध्यक्ष सीए रवींद्र नेरलीकर, डॉ अशोककुमार पगारीया, माजी अध्यक्ष सीए सुहास गार्डी, सीए सुनील कारभारी, कार्यकारी सदस्य सीए संतोष संचेती सीए अनिल अग्रवाल आणि सीए सचिन बन्सल (कार्यकारी सदस्य) विद्यार्थी प्रतिनिधी ओमकार धामणे, ओमकार डांगले, रिद्धी पांडे, ऋचा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
अध्यक्ष सीए भाटे म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी आयुष्यात सकारात्मक दृष्टीकोण ठेवावा, ध्येय गाठताना लक्षकेंद्रित करा, ध्येय गाठताना कठोर परिश्रम करा, कारण परिश्रमाला पर्याय नाही. सोशल मीडियामध्ये वेळ वाया घालू नका, असा सल्ला दिला.
दोन दिवसीय परिषदेत सीए पराग राठी, सीए वर्धमान जैन, सीए वैभव सांकला, भूषण तोष्णीवाल, सीए अनूप पेंडसे, सीए शेखर साने, सीए रवी सोमाणी, सीए कुसाइ गाववाला यांनी मार्गदर्शन केले. आयसीएआयच्या हिशोब प्रणाली समितीचे अध्यक्ष सीए शिवाजी झावरे यांच्या उपस्थितीत या परिषदेचा सांगता समारंभ संपन्न झाला.
सीए झावरे म्हणाले की, सीए हा व्यवसाय अर्थकारणाशी संबंधीत आहे. केंद्र सरकारच्या बदलत्या ध्येय धोरणांवर आपल्याला अपडेट रहावे लागते. बदलत्या काळानुसार सीएने बदलले पाहिजेत. सीए हा फायनान्शियल डॉक्टर असतो. समाजात आर्थिक परिवर्तन घडविण्याची जबाबदारी सीए वर आहे. या परिषदेत १५० सीए विद्यार्थी सहभागी झाले होते.
ओमकार धामणे, ओमकार डांगले, रिद्धी पांडे, ऋचा कुलकर्णी, अशोक पगारीया, युवराज तावरे, आमोद भाटे, सुहास गार्डि, प्राजक्ता चिंचोळकर, सुनील कारभारी










