- सर्वपक्षीय नगरसेवकांकडून कारवाईची मागणी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे. २०२१) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका सर्वसाधारण सभेत वैद्यकीय सेवेचे वाभाडे सर्वपक्षीय नगरसेविकांनी काढले. जम्बो कोविड रुग्णालयात दाखल झालेला रुग्ण गंभीर होतो. तरीही जम्बोत तीस हजार रुपये आणि ऑटो क्लस्टरमधील सेंटरमध्ये रुग्णांसाठी लाख रुपये घेऊन बेड दिला जात आहे. या प्रकरणांची चौकशी करावी, लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली.
ऑटो क्लस्टर येथील प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले जात नाहीत, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतली. अन्यथा आम्ही आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, अशा इशारा सदस्यांनी दिला. ऑटो क्लस्टर येथील प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली.
ऑटो क्लस्टरमध्ये रुग्णाकडून एक लाख रुपये घेतल्याप्रकरणी तपास करून महापालिका प्रशासनाकडून गुन्हा दाखल केला जाईल. तसेच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनास सूचना केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.