न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे. २०२१) :- पिंपरीतील हिंदुस्तान अँटिबायोटिक (एचए) कंपनी तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांनी सामूहिक सुटीचा इशारा दिल्यानंतर व सलग सुटी आल्याने कंपनी व्यवस्थापनाने एक दिवस सुटी जाहीर केली आहे.
एचएतील अनेक कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांनी अनेकदा सुटी देण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले. ३० एप्रिल ते २ मेपर्यंत सुटी राहणार आहे. ३ मे पासून कंपनीचे कामकाज पूर्ववत सुरू होणार आहे.