- पासबुक, एटीएम, डीडीसारखे व्यवहार रखडले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे. २०२१) :- बँकच्या शाखेत मर्यादित कर्मचारी ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, त्या कारणामुळे कामे वेळेवर होत नसल्याने नागरिकांची कुचंबणा होत आहे. पासबुक भरणे, खात्याची माहिती मिळवणे, नवीन पासबुक मिळवणे, डीडी काढणे यांसह इतर कामे होत नसल्याचे सागून अनेक बँकेचे कर्मचारी ग्राहकांना परत पाठवत आहेत.
ती कामे करण्यासाठी कर्मचारी नाहीत, असे तेथील शाखा अधिकारी सांगत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकेतील कर्मचारी संख्या कमी करण्याच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक पोलिस तेथे पाहणी करण्यासाठी येते. तेथे ठरवून दिलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक कर्मचारीअसल्याने बँकेवर दंड ठोठावण्यात येत आहे. मात्र, या कमी मनुष्यबळामुळे नागरिकांची कामे होत नसल्याचे दिसून येते.
चिंचवड येथील काही बँकत डीडी काढण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नाही. केवळ भरणा करू शकता, असे सांगितले. दुसरीकडे अन्य एका ठिकाणी ऑनलाइन सेवा जोडून घ्या, असे सांगून पाठवून दिले. या ना त्या कारणामुळे ग्राहकांना परत येत आहे. त्याच बरोबर पासबुक भरणे अथवा नवीन घेणे, स्टेटमेंट काढणे, खात्याची माहिती मिळवणे याची कामे ऑनलाइन करा, असे सांगून पाठवून देत आहेत. परिणामी, ग्राहकांना या कामासाठी बँकेत हेलपाटे मारावे लागत आहेत. याबाबत संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांनी हेल्पलाइनवर तक्रार करा, असे सांगून प्रतिक्रिया देण्याचे टाळले.